Soybean Market Rate Today Update या ठिकाणी आपण सोयाबीन बाजारभाव विषयी माहिती पाहणार
आहोत.सोयाबीनचे बाजार भाव सध्या काय आहेत, सोयाबीनची बाजार भाव किती रुपयांनी वाढले, सोयाबीनचे बाजार भाव अजून किती रुपयांपर्यंत वाढतील. या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आजचे सोयाबीन बाजार भाव पहा
Soybean Market Rate Today Update आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये सोयाबीनचे दर हे तेजीत आहेत, भारत देशातून सोयाबीनची निर्यात सुद्धा वाढलेली आहे आपल्या भारतातील सोयाबीनचा दर हा चांगल्या प्रकारे आहे.
पण या सोयाबीन भावाच्या फायदा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे दिसत नाही सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन 4 ते 5 महिने उलटून गेले आहेत.तरीसुद्धा शेतकरी बांधवांनी आपले सोयाबीन हे घरात किंवा गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले आहे.
पण सोयाबीन साठवून ठेवून सुद्धा मागील एक ते दीड महिन्यात सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही.या कारणामुळे अनेक शेतकरी बांधव आपली सोयाबीन ही मजबुरीने विकत आहेत .आता हंगाम सुरू होऊन चार महिने त्यावर झाले आहेत. सरासरी सात ते आठ महिने बाकी आहेत. पण शेतकरी बांधवांनी सोयाबीन साठवून ठेवून सुद्धा सोयाबीनचे दर का वाढत नाहीत हे जाणून घेऊया.
सोयाबीन मधील तेजी-मंदी चा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल का हे आपण पाहूया.
आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात सोयाबीनला हा चांगल्या प्रकारे दर मिळत आहे. आपल्या देशातून निर्यात सुद्धा ही वाढलेली आहे. म्हणजेच, सोयाबीन विकत आहेत .किंवा सोयाबीन विक्रेत्यांकडून घेत आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. पण या सर्व गोष्टींचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना मिळत नाही.
आजचे सोयाबीनचे दर सध्याच्या बाजार दरांनुसार, महाराष्ट्रात सोयाबीनची कमाल किंमत 5076.00 INR/क्विंटल आहे. तर, महाराष्ट्रात सर्व जातींसाठी किमान दर 5091.00 INR/क्विंटल आहे. आत्ता सध्या ची स्थिती पाहता शेतकरी बांधवांकडे सोयाबीनचा साठा हा भरघोस आहे, शेतकरी बांधवांनी सोयाबीनची विकलेली नाही .Soybean Market Rate Today Update
आपल्याला माहिती आहे की, शेतकरी मित्र हे डायरेक्ट निर्यात करणार नाहीत.किंवा काही शेतकरी जास्त दिवस आपली सोयाबीन हे घरात ठेवू शकत नाहीत. असे अनेक कारण उद्योगपत्यांना माहीत आहे .यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन ही या दरात विक्री करावी असा यांचा उद्देश आहे. अशी माहिती ही सूत्रांकडून कळवण्यात येत आहे.
सोयाबीनचा दर हा सोया पेंड च्या दरावर अवलंबून असतो. हे तर सर्वांना माहीतच आहे, कारण की सोयाबीनमध्ये सरासरी 20 टक्क्याच्या आसपास तेल आणि 78 ते 80% च्या दरम्यान सोयाबीन मध्ये पेंड मिळते.देशात सोयाबीन उत्पादन हे जास्त होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सोयाबीनची निर्यात वाढणे हे अत्यंत गरजेचे आहे,आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीचे दर हे खूप प्रमाणात जास्त आहेत.
म्हणजेच भारताची सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दरा पेक्षा खूप स्वस्त आहे. यावर्षीच्या हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत चार लाख टन च्या आसपास सोयाबीन ही निर्यात झाली आहे.तर मागील वर्षी याच दिवसात सरासरी दोन लाख 70 हजार टन च्या आसपास सोयाबीन ही निर्यात झाली होती. आणि जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनची निर्यात वाढली. अशी माहिती सूत्रांकडून कळवण्यात येत आहे .
पण जानेवारी महिन्यात किती सोयाबीन निर्यात झाली याची माहिती अजून सांगितली गेली नसून, एप्रिल महिन्यात चार लाख टन सोयाबीन निर्यात होऊ शकते. असा अंदाज वर्तवला आहे.सोयापेंड साठी शेतकऱ्यांना संधी असताना या संधीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही असे दिसत आहे.
सध्या शेतकरी बांधवांकडे खूप प्रमाणात सोयाबीन ही साठवून साठवून ठेवलेले आहे. आंतरराष्ट्रीय भाव पातळीवर सोयाबीन निर्यात आणि शेतकरी बांधवांनी ठेवलेला सोयाबीनचा साठा पाहता ,यावेळी सोयाबीनचे दर वाढण्याची हे अत्यंत गरजेचे होते.ती सुद्धा झाली नाही सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, सोयाबीन निर्यातीसाठी सौदे हे वेगाने होत आहेत. हे सोयाबीन निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी यांना सोयाबीन ही खरेदी करावी लागणारच आहे.