Waiver List : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचा निधी शासनाकडून मिळाला असला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नव्या पद्धतीने याद्या तयार झाल्या नसल्याने हे अनुदान रखडले आहे.
खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान केले. यात हाताशी आलेले पीक वाया गेले होते. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील मक्याचे पीक जमिनीवर आडवे झाले तर कपाशीच्या शेतात पाण्याचे डोह साचल्याने कपाशीला लागलेल्या तोड्या काळवंडल्या होत्या.
या नुकसानीमुळे शेतकरी खचून गेल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली; परंतु, अनुदान वाटपात घोळ होऊ नये, तसेच एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करणार आहे.
50 हजार रुपयाची या जिल्ह्यातील तिसरी यादी जाहीर; येथे क्लीक करून पहा यादीत आपले नाव
👉येथे क्लीक करा👈