Gharkul Yojna Update प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे.
लवकरच नवीन घरकुल यादी जाहीर होणार आहे. आणि यासाठी जे 1 लाख 20 हजार रुपये अनुदान मिळते यात सुद्धा वाढ केली जाणार आहे. संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Gharkul Yojna Update प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे,
आणि ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित घरकुले पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य राहील अशी माहिती ग्रामविकास मंत्री यांनी दिलेली आहे.
Gharkul Yojna Update विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भातील प्रश्न हा उपस्थित केलेला होता. आणि त्याला उत्तर देताना मंत्री श्री महाजन हे बोलले होते. ते म्हणाले होती की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2024 पर्यंत सर्वांसाठी घरी देण्याची योजनाही जाहीर केलेली आहे.
आमच्या हाॅट्सअप ग्रुप ला जाॅईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
आणि त्या अनुषंगाने, राज्य शासनाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य शासनाला 14 लाख 18 हजार 78 घरकुलांचे उद्दिष्ट हे देण्यात आलेले होते. त्यापैकी, 14 लाख 16 हजार 23 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.उर्वरित 2055 घरकुलांना मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितलेले आहे.
अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात आतापर्यंत 99 लाख 3 हजार 791 घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत.आणि या घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे, घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे, आधी माध्यमातून घरकुले बांधण्याच्या कामाला हा वेग देण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
तर अशाप्रकारे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीच्या अनुसार लवकरच नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच घरकुल बांधकामासाठी जे अनुदान मिळत आहे.त्यात सुद्धा वाढ करण्याच्या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, अशी माहिती दिलेली आहे.