Crop insurance update पिक विमा संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे.ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा हा भरलेला आहे.त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की,त्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत.त्यासंदर्भातील जीआर सुद्धा आलेला आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Crop insurance update पूर्ण रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2022 साठी राज्य हिस्स्याची 22 कोटी 40 लाख 58 हजार 878 एवढी रक्कम विमा कंपनीत अदा करण्यासाठी, वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, व मत्स्य व्यवसाय विभाग 13 मार्च 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Crop insurance update शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे दृष्टीने मदत व्हावी, यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहेत.
आणि विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट ही येते.
आणि पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.आर्थिक सर्व बाबींचा विचार करूनच आता शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात, सन 2021-22, 2022-23 आणि 2023- 24 या तीन वर्षांमध्ये
संत्रा, मोसंबी,डाळिंब,चिकू,पेरू,लिंबू,सीताफळ, आणि द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एचडीएफसी, ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या सर्व विमा कंपनीच्या मार्फत संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.
पिक विमा यादीत तुमचे नाव आहे का ते पहा
तर आता शासन निर्णय पाहूया.
पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृत बहार सन 2022 च्या अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारत घेऊन, राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 22 कोटी 40 लाख 58 हजार 878 एवढी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार, विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
आणि सदरची रक्कम मृग बहार हंगाम 2022 करिता वितरित करण्यात येत आहे.आणि त्याचा वापर इतर हंगामांकरिता सुद्धा अनुज्ञेय असणार नाही.तसेच प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च देखील लेखशीर्षाखाली वर्ष 2022-23 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा.
तर अशाप्रकारे, ज्या शेतकऱ्यांनी फळपिक विमा भरलेला आहे.अशा शेतकऱ्यांना आता पिक विम्याची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.