Cotton-soybeans increase rates : देशभरातील बाजारपेठेमध्ये कापूस व सोयाबीन दबावताना दिसत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दर वाढले आहेत.
आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस सोयाबीन व सोयापेंड यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली दिसून आली आहे. मात्र देशभरातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीसाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. पुढील काही दिवसांमध्येच कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढतील. असा अंदाज तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.Cotton-soybeans increase rates
सध्या देशभरातील बाजारपेठेमध्ये कापसाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली आहे. असे करूनही दर पातळी काही वाढली नाही. आजही कापसाला सरासरी आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दर प्रतिक्विंटल मागे मिळत आहे. यामध्ये काही बाजारपेठेत कमाल दर थोडेफार वाढले आहेत.
Cotton-soybeans increase rates:पण सरासरी दराची पातळी ही कायमच राहिली आहे. गाठींचे भाव देखील 62 हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत. कापसाची एक गाठ 356 किलोचे असते. रुईला प्रतिक्विंटल मागे भाव 17400 रुपये इतका मिळत आहे.
आपण जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर कापसाची म्हणजेच रुईची प्रत्यक्ष खरेदी करत असताना दरामध्ये म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स १०२ सेंट प्रतिपाऊंडवर होता. ही आकडेवारी रुपयांमध्ये सांगायची झाली तर अठरा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटरला दर मिळत होता.
मात्र देशभरातील पूर्वीचा भाव हा सतरा हजार चारशे रुपये च्या घरात जात होता. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व देशभरातील बाजारपेठेमध्ये जवळपास एक हजार रुपयांचा फरक दिसून आला. देशामध्ये कापसाचे भाव जास्त आहे अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे.
सोयाबीन व कापसाचे दर वाढण्याची शक्यताया मागचे कारण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मार्च महिन्यातील डिलिव्हरी साठी पुरवला जाणारा कापसाचा दर हा 85.43 सेंट प्रतिपाऊंडवर आलेला होता. म्हणजेच ही आकडेवारी रुपयात बघितली तर पंधरा हजार 450 रुपये इतके होते. देशांमधील प्रत्यक्ष खरेदी केलेल्या दराची तुलना ही प्रत्यक्षपणे उद्योग वायद्यातील दराशी केली जाते. त्यामुळे देशभरात आपल्याला जास्त भाव दिसत आहे.
आता सोयाबीन ची स्थिती बघूया आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन व सोया पेंड च्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. मात्र सरासरी दर पातळी वाढलेली दिसून आली आहे.
Cotton-soybeans increase rates :सध्या सीबाॅटवर सोयाबीन चा फायदा हा 15.29 डॉलर प्रतिबुशेल्सवर पोचला आहे. रुपयांमध्ये हा भाव बघायचा झाला तर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव होतो. मात्र देशभरामध्ये आजही सोयाबीनचे दर हे कमी झालेले दिसून आले आहेत. सोयाबीनला आज देशभरामध्ये सरासरी पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये दर मिळत आहे.
देशभरामध्ये सोयाबीनचा दर वाढेल असा अंदाज होता. पण खाद्य तेलाचे भव कमी झाले यासोबतच वाढलेली आवक पाहून आता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे.
सोयाबीन व कापसाचे दर वाढण्याची शक्यताया मागचे कारण पाहण्यासाठी येथे क्लिक करा