Cotton rate Today कापूस भाव पोहोचले 10 हजार रुपयांवर

Cotton rate Today यावर्षी सुद्धा बहुतांश कापूस शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात विक्री केलेला आहे.

मागील हंगामामध्ये कापसाचे भाव वाढले, म्हणून यावर्षी शेतकऱ्याने कापूस विक्री दोन महिने केली नाही. यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाचे दर आठ हजार रुपये च्या पुढे गेलेले होते, पण नंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवली यामुळे कापसाचे दर सुद्धा घसरले आहेत.

आजचे कापुस भाव

बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे उद्योगांनी भाव सुद्धा कमी केले.यावर्षी फरक एवढाच आहे की,मागील वर्षीपेक्षा काही जास्त कापूस शेतकऱ्याने मागे ठेवलेला आहे. पण त्याचे प्रमाण सुद्धा कमी आहे.यातील किती शेतकरी थांबू शकतात, हे सुद्धा पहावे लागणार आहे.

 

या वर्षी सुद्धा कापूस उत्पादन कमी असल्याचे दिसत आहे.यामुळे दारात तेजी येणार होती. पण जास्तीत जास्त कापूस फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यात बाजारामध्ये आलेला आहे.देशातील उत्पादन किती आहे. या सोबतच उत्पादन हंगामातील बारा महिन्यांपैकी किती दिवसात बाजारात कापूस येतो. यावरही बाजारातील कौल अवलंबून असतो.

 

शेतकरी जास्त दिवस कापूस ठेवू शकत नाहीत, हंगामाच्या महिन्यानंतर म्हणजेच मार्च महिन्यानंतर शेतकऱ्यांकडे कापूस पुरवठा जास्त असतो. यामुळे तेजीचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना कमीच होतो. याचा अनुभव मागील वर्षी शेतकऱ्यांना आलेलाच असेलआता देशातील बाजारात कापसाचे भाव काय आहेत ते पाहूया.

आजचे कापुस बाजार भाव

देशातील वायद्यांमध्ये मोठी तेजी आलेली आहे.दोन दिवसांमध्ये एप्रिलच्या वायद्यामध्ये खंडी मागे 600 रुपयांची वाढ झालेली आहे. आज दुपारपर्यंत 63 हजार 300 रुपये होते. तर जूनचे वायदे 800 रुपयांनी वाढ झालेली आहे. जून चे वायदे ६४ हजार 800 रुपये स्थिर होते.

 

पुढील काळामध्ये देशात कापसाचा पुरवठा कमी राहणार आहे. यामुळे वायद्यामध्ये तेजी राहणार आहे.बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार रुपये ते 8 हजार 200 रुपये पर्यंत बाजार भाव मिळत आहे. या दारात शेतकऱ्याने कापसाची विक्री कमी केल्यास, दरास सुधारणा होऊ शकते.

या बँकेत खाते असेल तर मिळणार एक लाख रुपये

Shetkari update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले पाच मोठे निर्णय

 

Leave a Comment