Flour Mill Machine Maharashtra: महाराष्ट्र शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते, अशीच एक योजना महिलांसाठी देखील राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे, त्याचप्रमाणे महिलांना रोजगाराचे एक साधन देखील मिळणार आहे.

म्हणूनच सरकार महिलांसाठी ही योजना राबवत आहे, ती म्हणजे मोफत पीठ गिरणी योजना यामध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे.
वयोमर्यादा
• 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
नियम व अटी (Flour Mill Machine)
• लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे • वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर
करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
• सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा
अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
• जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.

या महिलांना मिळणार लाभ
• मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे.
अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.
• ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, या योजनेसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समितीच्या महिला व समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन, या योजनेविषयी चौकशी करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यातील फॉर्म भरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल…
अर्ज कसा करावा
Mill Machine Maharashtra
जाहिरातीत दिलेल्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याची प्रिंट कॉपी घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत पंचायत समिती,
• जिल्हा परिषद यापैकी कोणत्याही कार्यालयात जाऊन या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवायची आहे, अर्जामध्ये सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
हे पण वाचा
👇👇👇
कुक्कुटपालन सुरू 25 लाख अनुदान ऑनलाईन अर्ज…!