Loan waiver : या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, बँकेचे कर्जदार शेतकरी होणार कर्जमुक्त; शासन निर्णय यादी पहा.
loan waiver : नमस्कार मित्रांनो मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बँकेने प्रक्रिया सुरू केली असून मार्चअखेर ती पूर्ण होईल. loan waiver list maharashtra
त्यामुळे हे शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. भूविकास बँक शेतकऱ्यांना विहिरी खोदणे, पाईपलाईन, ट्रॅक्टर खरेदी करणे आदींसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देत असे.
loan waiver भूविकास बँक शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांच्या अर्जावर कर्ज देते. एवढेच नाही तर अवघ्या 70 रुपयांत कर्जाचा बोजा सात-बारा झाला. शेतकऱ्यांना नाममात्र दराने कर्ज देणारी बँक वेळेवर वसुली करु न शकल्याने आणि सरकारने बँकेला हमी देण्यास नकार दिल्याने अडचणीत आली.
बँकेने कर्ज देणे बंद करून केवळ कर्जवसुली सुरू केली होती. मात्र, मध्यंतरी सरकारने जाहीर केलेल्या विविध कर्जमाफी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाचा डोंगर वाढतच गेला.
नोव्हेंबर 2022 पर्यंत राज्यातील 34 हजार कर्जदार शेतकऱ्यांची एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची मुद्दल व व्याज थकीत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत आणि सरकारने त्यांची कर्जमाफी केली नाही.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 128 कोटी रुपये माफ होणार आहेत
debt forgiveness कर्जमाफी योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 4 हजार 115 शेतकरी पात्र असून, त्यांची 38 कोटी 94 लाख रुपयांची मुद्दल रक्कम आणि 91 कोटी 58 लाख रुपयांचे व्याज माफ होणार असून, एकूण 128 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. मार्चअखेर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असे बँकेचे जिल्हा व्यवस्थापक कुटे यांनी सांगितले.