Kapus Bajarbhav : कापसाच्या बाजारभावात वाढ ! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी कापूस 10 हजारावर ; अजून वाढणार का कापूस दर?

Kapus Bajarbhav : कापूस हे भारतात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरम्यान सध्या देशांतर्गत कापसाची आवक कमी झाली असून उद्योगाकडून कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे कापूस दराला थोडासा दिलासा मिळाला असून कापसाच्या बाजार भावात 300 ते 400 रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे

 

जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

मित्रांनो काल सात नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या लिलावात उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक नऊ हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. म्हणजेच उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटलकडे वाटचाल करू लागला आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी बाजारभाव 9300 एवढा मिळाला असून किमान बाजार भाव 9000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

एकंदरीत उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावाचा विचार केला असता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल ते 9,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सरासरी बाजार भाव मिळाला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात जी काही घसरण होतं होती ती घसरण आता थांबली असून कापूस बाजाराला उभारी मिळत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या तेलबिया पेंड चढ्या दरात विक्री होत असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली आहे.
सरकी पेंडची मागणी आणि बाजार भाव वाढले असल्याने सरकीची देखील मागणी आणि बाजार भाव वाढले आहेत. सरकीची मागणी वाढली असल्याने कापसाच्या मागणीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी 

येथे

क्लिक करा..

यामुळे कापसाच्या बाजारभावात सुधारणा होत असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. दरम्यान, कापूस बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीला दबावत होते. मात्र आता कापूस बाजारभावात वाढ होत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची शक्यता असून कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव कायम राहू शकतो. सरासरी बाजार भाव 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर निश्चितच कमाल बाजारभावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment