Karj Mafi update साली लागू करण्यात आलेल्या
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.
Karj Mafi update तर आपण जाणून घेणार आहोत की,
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच कर्जमाफीचा कालावधी हा काय असणार आहे, तसेच कर्जमाफीसाठी पात्रता कोणत्या प्रकारे ठरवली जाणार आहे.
- Karj Mafi update आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज पुनर्गठन म्हणजेच नवे-जुने केलेले आहे. त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल का नाही? या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सिबिल स्कोर येवढा असेल तर बॅंक देणार 3 लाख रुपये लोन.
सदर योजनेच्या अंतर्गत, कर्जमाफीसाठी पात्रता ठरवितांना थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प/अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारत न घेता, दि. 1 एप्रिल 2012 रोजी आणि त्यानंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अशा कर्जांपैकी दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना, काही निकषांच्या आधी राहून सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहन पर लाभ हा देण्यात येणार आहे.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दि. 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल आणि व्याजासह 1 लाख 50 हजार रुपये मर्यादे पर्यंतचे कर्ज हे माफ करण्यात येणार आहे. मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जर जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकमेव समझोता योजना म्हणून दि. 30 जून 2016 रोजी थकबाकी कर्जांपैकी शासनातर्फे 1 लाख 50 हजार रुपये रकमेचा लाभ हा देण्यात येणार आहे.
सन 2015-16 या वर्षामध्ये घेतलेल्या पीक कर्जाची दि. 30 जून 2016 पर्यंत पूर्णपणे परतफेड केलेल्या अशा शेतकऱ्यांनी, सन 2016-17 या वर्षांमध्ये घेतलेल्या कर्जाची रक्कम ही 30 जून 2017 पर्यंत जर पूर्णपणे परतफेड केलेली असेल तर,अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्जाच्या 25% किंवा 25 हजार रुपये एवढ्या रकमेचा लाभ हा देण्यात येणार आहे.
सन 2012-13 ते सन 2015-16 या वर्षांमध्ये कर्जाचे नवे जुने केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना, सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ हा देण्यात येणार आहे.
तर या कर्जमाफी योजनेचा लाभ हा फक्त राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आणि ग्रामीण बँका या बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
तर अशाप्रकारे कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे.